माऊली नौकरी नामा

चला स्मार्टपणे काम करूया…..

WhatsApp Group Join Now
JoinTelegram Group Join Now

सिडको महागृहनिर्माण योजना (CIDCO)

माझे पसंतीचे सिडकोचे घर खरेदीची प्रक्रिया

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा

    • नोंदणीच्या संकेतस्थळाला भेट द्या, तुमचे पूर्ण नाव आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून लॉगिन करा.
    • आधार नंबर प्रविष्ट करा आणि ओटीपी पडताळणी पूर्ण करा.
    • पॅन कार्ड तपशील प्रविष्ट करा.
    • तुमची श्रेणी निवडा, सह-उमेदवाराचे तपशील प्रविष्ट करा (लागू असल्यास) आणि आवश्यकतेनुसार सर्व स्व-साक्षांकित कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे अपलोड करा.
    • रु. २३६/- (GST सह) विनापरतावा नोंदणी शुल्क भरा आणि अर्ज सादर करा.

योजनेच्या लॉंचिंगची प्रक्रिया

पसंतीची निवड आणि बुकिंग रकमेची विंडो १५ दिवसांसाठी खुली असेल.
    • ज्या अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या पसंती निवडण्यासाठी सूचित केले जाईल.
      ग्राहक एकूण १५ पसंती निवडू शकतो. त्या १५ पसंतीची निवडपद्धती पुढील प्रमाणेः

      • अर्जदार सोडतीच्या तीन फेऱ्यांध्ये भाग घेऊ शकतात.
      • प्रत्येक फेरीत अर्जदार त्याच्या किमान १ (एक) व कमाल ५ (पाच) निवडी देऊ शकतो,
      • निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थळावरील टॉवर व मजल्यांचे जास्तीत जास्त ५ पसंती निवडू शकतो. कुठल्याही सोडत फेरीमध्ये प्रकल्प स्थळाबाबत कोणतीही मर्यादा नाही, परंतु प्रत्येक फेरीत एकूण ५ पसंतीची मर्यादा आहे.
    • पसंती दिल्यानंतर, अर्जदारांना बुकिंग रक्कम भरावी लागेल. अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटासाठी (EWS) ₹७५,०००/- , त्याचप्रमाणे अल्प उत्पन्न गटाच्या (LIG) १ बीएचके सदनिकेसाठी ₹१,५०,०००/- आणि अल्प उत्पन्न गटाच्या (LIG) २ बीएचके सदनिकेसाठी ₹२,००,०००/- असेल.
    • बुकिंग रक्कमेची विंडो बंद झाल्यानंतर, पात्र ग्राहकांची मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या ग्राहकांची नावे मसुदा यादीत नाहीत ते त्यांच्या हरकती यादी प्रकाशित झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत त्यांच्या हरकती नोंदवू शकतात.
    • हरकतींचे निराकरण हे हरकती नोंदवण्याच्या तारखेनंतरच्या ७ दिवसांत केले जाईल.
    • सर्व हरकतींचे निराकरण केल्यानंतर ५ दिवसांनी पात्र ग्राहकांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.
    • सोडतीच्या तारखा नंतर जाहीर होतील. सोडतीची अंमलबजावणी झाल्यावर, यशस्वी अर्जदारांची यादी सिडको संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल आणि यशस्वी विजेत्यांना ‘इरादा पत्र’ (लेटर ऑफ इंटेंट) जारी केले जाईल.
    • लॉटरी प्रक्रियेत अपयशी ठरलेल्या ग्राहकांना बुकिंगची रक्कम ३० दिवसांच्या आत परत केली जाईल
    • विजेत्यांना इरादा पत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार उर्वरित बुकिंग रक्कम भरण्यासाठी सूचित केले जाईल.
    • सर्व विजेत्यांची कागदपत्रे डिजिटल पद्धतीनेच तपासली जातील आणि यशस्वीरीत्या पडताळणी झालेल्या अर्जदारांना नोंदणी पोर्टलवर हप्त्यांच्या वेळापत्रकासह वाटप पत्र दिले जाईल.
    • हप्ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर कराराची प्रक्रिया सुरू केली जाईल.
    • करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
    • हस्तांतरणाच्या दिवशी घर घरमालकांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द केली जाईल

माझे प्राधान्य सिडको होम खरेदीसाठी अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रे:

(सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या स्कॅन प्रती या jpg/ png/ pdf स्वरूपात व आकाराने २ एमबी पेक्षा जास्त नसाव्यात. रहिवास प्रमाणपत्रासाठी बारकोड अनिवार्य आहे.)
    • आधार क्रमांक आणि आधार कार्डाची स्कॅन केलेली प्रत
    • पॅन कार्डची स्कॅन केलेली प्रत
    • मोबाईल क्रमांक (आधारशी लिंक असलेला)
    • ईमेल आयडी.
    • सह-अर्जदाराची माहिती – (लागू असल्यास- आधार कार्ड आणि पॅन कार्ड)
    • नवीन छायाचित्र – (नोंदणीच्या तारखेस ९० दिवसांपेक्षा जुने नसावे)

घराची मालकी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – अर्जदार किंवा त्यांचा/तिचा पती/पत्नी आणि अविवाहित मुले यांच्या नावार भारतात पक्के घर नसावे.
अल्प उत्पन्न गट – अर्जदार किंवा त्याचा/तिचा पती/पत्नी आणि अविवाहित मुले यांच्या नावावर नवी मुंबईत घर नसावे.
      • उत्पन्नाचा पुरावा (मूलभूत वेतन + महागाई भत्ता (DA) + CAA + सर्व प्रकारचे भत्ते (वैद्यकीय/धुलाई/शिक्षण/प्रवास/कॅन्टीन/HRA वगळता) + विशेष भत्ते + बोनस + ओव्हरटाइम याचा विचार केला जाईल.):
        • – कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष २०२३-२०२४चे आयकर रिटर्न (ITR) तपशीलात्मक असावेत. (आयकर रिटर्नचे एकच पान विचारात घेतले जाणार नाही.) किंवा
        • तहसीलदाराने दिलेले किमान ३ सलग आर्थिक वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र, किंवा
        • मागील १२ महिन्यांच्या वेतन पावत्या, किंवा
        • नियोक्त्याची (Employer) स्वाक्षरी असलेले उत्पन्न प्रमाणपत्र, किंवा
        • नियोक्त्याकडून (Employer) नियमित वेतन जमा झालेल्या बँक स्टेटमेंट्सची स्कॅन केलेली प्रत
        • जर सह-अर्जदार कमावता नसेल तर, तसे घोषणापत्र जमा करणे आवश्यक आहे. (कृपया फॉर्म G बघावा)
      • रहिवास प्रमाणपत्र : अर्जदाराचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागात किमान १५ वर्ष वास्तव्य असावे (माजी सैनिकाना या अटीतून सूट).
      • पीएमएवाय प्रमाणपत्र (जर अर्जदाराला शासकीय अनुदान घ्यायचे असल्यास) – अर्जदारांनी केंद्र सरकारच्या https://pmaymis.gov.in या संकेत स्थळावर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी केलेली असावी.
      • ज्या ग्राहकांना इरादापत्र (लेटर ऑफ इन्टेन्ट) प्राप्त झाले आहे व ते पीएमएवाय (PMAY) योजनेच्या सरकारी अनुदानाचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी पनवेल महानगरपालिकेतील पीएमएवाय सेलला भेट द्यावी. ग्राहकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, इरादापत्र आणि उत्पन्नाचा पुरावा यांच्या ३ छायांकित प्रती सोबत आणाव्यात व आपली नोंदणी करावी.
      • अल्प उत्पन्न गट (फॉर्म B)
      • संवैधानिक प्रवर्ग (जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र)
        • अनुसूचित जाती
        • अनुसूचित जमाती
        • अधिसूचित जमाती
        • विमुक्त जमाती
      • दिव्यांग (शारीरिक विकलांग) : दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६च्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे, ज्यामध्ये अर्जदाराने दिव्यांग (PH) प्रवर्गाचा दावा केलेला आहे हे प्रमाणित करणे आवश्यक आहे. यामध्ये अंधत्व, कमी दृष्टी, कुष्ठरोगातून बरे झालेले, ऐकण्याची क्षमता गमावलेले, अस्थि-चालकताविषयक अपंगत्व, मानसिक मंदता, ऑटिझम, मानसिक आजार, विशिष्ट शिकण्यासंबंधी अपंगत्व, बौद्धिक अपंगत्व या गोष्टींचा समावेश आहे. पात्रतेसाठी किमान ४०% अपंगत्व असणे आवश्यक आहे.
      • गैर-संवैधानिक प्रवर्ग: सक्षम प्राधिकाऱ्याचे वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.
        • राज्य सरकारी कर्मचारी (महाराष्ट्र शासनाद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद कर्मचारी इ.) : फॉर्म C प्रमाणपत्र – अधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह त्यांच्या शासकीय विभागाच्या लेटरहेडवर आवश्यक आहे.
        • सिडको कर्मचारीः फॉर्म सी प्रमाणपत्र – सिडकोच्या लेटरहेडवर अधिकृत अधिकाऱ्याच्या सही आणि स्टीकरसह.
          टीप: CIDCO च्या कर्मचार्‍यांना केवळ अल्प उत्पन्न गट / अल्प उत्पन्न गट – ए / अल्प उत्पन्न गट – बी या गटांत अर्ज करणे शक्य आहे.
        • पत्रकार – सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी (PRO) यांनी जारी केलेले प्रमाणपत्र आणि फॉर्म D: पत्रकाराचे घोषणापत्र
        • धार्मिक अल्पसंख्याक – शाळा सोडल्याचा दाखला आणि फॉर्म E: धार्मिक अल्पसंख्याक असल्याचे नोटरीकृत प्रतिज्ञापत्र
        • महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त व्यक्ती – मेट्रो सेंटर/संबंधित विभागाद्वारे जारी केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, निवाडा प्रत आणि ७/१२ उतारा तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबवृक्षाचे (वंशावळ) प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
        • माजी सैनिक, त्यांचे आश्रित व निमलष्करी दलाचे कर्मचारी (सेना, नौदल, हवाईदल, सीमा सुरक्षा दल, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल, आयटीबीपी, एनएसजी, आसाम रायफल्स, निमलष्करी व सीमा सुरक्षा दल) व त्यांचे आश्रित – माजी सैनिकांचे ओळखपत्र/सेवा पुस्तिका/जिल्हा सैन्य मंडळ किंवा संबंधित संरक्षण प्राधिकरणांनी दिलेले प्रमाणपत्र. (सेना, नौदल, हवाईदल, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एनएसजी, आसाम रायफल्स, निमलष्करी व सीमा सुरक्षा दल) व त्यांचे आश्रित
        • माथाडी कामगार – माथाडी बोर्डाचे प्रमाणपत्र (केवळ मुंबई महानगर क्षेत्रासाठी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *