सदरील पिक विमा रब्बी मध्ये होणारे बदल आणि इतर माहितीसाठी आपण अधिकृत सीएससी जिल्हा समन्वयक / व्यवस्थापक (CSC DC/DM) यांच्याशी संपर्क साधावा.
आता रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत रब्बी पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. रब्बी हंगामात पिकांना विमा सरंक्षण मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे गरजेचे असणार आहे.
रब्बी पिक विमा हे महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी एक योजना या योजनेच्याद्वारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक संरक्षण दिले जाते या मार्फत पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची योग्य वेळेत नोंदणी करावी लागेल आणि विमा प्रीमियम भरावा लागेल नैसर्गिक आपत्ती रोग कीड यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ही योजना शेतकऱ्यांना मदत करते.
रब्बी पिक विम्याची प्रमुख वैशिष्ट्ये खाली देत आहोत,
- रब्बी हंगामातील पिकांसाठीच हा विमा लागू असेल.
- नैसर्गिक आपत्ती, किड व रोग यांपासून पिकांचे संरक्षण.
- शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करणे आवश्यक असेल.
- शेतकऱ्यांसाठी खूप कमी दरात प्रिमियम.
- शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवण्याची सुविधा यात दिली जाते.
पिक विमा म्हणजे काय ते आपण प्रथम जाणून घेऊयात.
“पिक विमा” म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे विमा संरक्षण, जो त्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत पुरवतो. पिक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई देतो.
पिक विम्याचे मुख्य उद्दीष्ट
- पिकांना झालेल्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे, विशेषत: अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ, रोग, कीड अशा इतर नैसर्गिक आपत्ती.
- शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळवून देणे.
- पिक विमा योजना शेतकऱ्यांना कमी प्रीमियमच्या दरात उपलब्ध करून देणे, ज्याच्या मुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडते.
पिक विम्याचे प्रमुख प्रकार जाणून घेऊयात.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)- ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे, ज्यात विविध प्रकारच्या पिकांना विमा दिला जातो.
- राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS)- काही विशिष्ट पिकांसाठी असलेल्या विमा योजनेचा प्रकार.
- राज्यस्तरीय विमा योजना- वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.
पिक विमा कसा काम करतो ते इथे बघुयात?
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विमा नोंदणी करणे गरजेचे असते.
- शेतकऱ्यांना विम्याचा प्रीमियम थोड्याफार प्रमाणात भरावा लागतो.
- पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर आणि ते चेक केल्यानंतरच विमा रक्कम दिली जाते.
पिक विमा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे, जे त्यांना अनिश्चिततेच्या काळात आर्थिक अडचणीतून वाचवते.
पिक विमा रब्बी आणि खरीप या दोघांसाठी कसा आता हे बघुयात.
पिक विमा योजना रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील पिकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी आहे. प्रत्येक हंगामातील हवामानाच्या स्थितीनुसार आणि जोखमींनुसार ही विमा योजना राबवली जात असते.
खरीप हंगामातील पिक विमा-
खरीप हंगाम जून ते सप्टेंबरपर्यंत चालतो. या हंगामात पिके पावसावर अवलंबून असतात, त्यामुळे पाऊसाचे प्रमाण जास्त किंवा कमी झाल्यास पिकांना मोठा धोका असतो. खरीप पिकांसाठी विमा योजना शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, वादळ आणि कीटकनाशकांपासून संरक्षण देते.
खरीप पिके – तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस इत्यादी.
त्या दिवसातील धोके – अतिवृष्टी, अनियमित पाऊस, कीड आणि रोगांचा प्रसार.
विमा संरक्षण – खरीप हंगामात नुकसान झाल्यास विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात.
रब्बी हंगामातील पिक विमा-
रब्बी हंगाम ऑक्टोबर ते मार्चपर्यंत चालतो. या हंगामात कमी पाऊस आणि थंड हवामानामुळे वेगवेगळे धोके निर्माण होतात. रब्बी पिकांसाठी विमा योजना थंडी, गारपीट, दुष्काळ आणि पिकाच्या गुणवत्तेत आलेली घट यापासून शेतकऱ्यांना संरक्षण देते.
रब्बी पिके – गहू, हरभरा, ज्वारी, मसूर, भुईमूग इत्यादी.
धोके – थंडी, गारपीट, दुष्काळ किंवा कमी पाऊस.
विमा संरक्षण – रब्बी हंगामात नुकसान झाल्यास विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात.
Rabbi Pik Vima पिक विमा योजनेचा भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता अर्ज एकदम सहज करताय यावा यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तुम्ही वेबसाईटवर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत देखील अर्ज करू शकता.
तुमच्या पिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो, त्यासाठी रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत संपण्यापूर्वी अर्ज करणे गरजेचे असणार आहे.
Leave a Reply